एलबीटीचा तिढा सुटण्याची शक्यता CM meeting on LBT

एलबीटीचा तिढा सुटण्याची शक्यता

एलबीटीचा तिढा सुटण्याची शक्यता
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एलबीटीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. कारण एलबीटीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरु झाले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली.

या बैठकीत एलबीटीमधून फेरीवाल्यांना वगळण्याचा प्रस्ताव ठेवल्याचं समजतंय. तसंच LBT मर्यादा ५ लाखांवर नेण्याचाही प्रस्तावही असल्याचं बोललं जातंय. या बैठकीत काँग्रेसनं भाजपवरही हल्लाबोल केलाय. LBTवरून भाजप नेते बदनाम करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

एलबीटी प्रश्नी राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे, असं सांगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. एलबीटीवर समन्वयानं तोडगा काढला जावा, हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं आबा सांगत आहेत.


एकूणच एलबीटीच्या संपामुळे लोकांच्या हालांशी राजकारणात मश्गुल असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला काही देणंघेणं आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय.

First Published: Sunday, May 12, 2013, 19:34


comments powered by Disqus