Last Updated: Wednesday, October 24, 2012, 16:52
www.24taas.com, मुंबईमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एक गोड बातमी देणार आहेत. काय असणार ही गोड बातमी याबाबत आपल्यालाही उत्सुकता असेलच की, आपल्या सगळ्यांचा जवळच्या विषयावरच मुख्यमंत्री बोलणार आहेत. सहाहून अधिक 3 सिलिंडर सबसिडीने द्यावेत की नाहीत, याचा निर्णय दिवाळीपूर्वी घेण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.
तर मुंबई महापालिका कर्मचा-यांसाठी खूखखबर.. दस-याच्या मुहुर्तावर मुंबई महापालिका कर्मचा-यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलाय. मुंबई महापालिका कर्मचा-यांना 12 हजार 100 रुपये बोनस मिळणार आहे.. यामुळं महापालिकेवर 130 कोटींचा बोजा पडणार आहे.. दस-यापूर्वीच दिवाळी बोनस जाहीर झाल्यानं मुंबई मनपा कर्मचारी सुखावले आहेत.
दुसरीकडे नवी मुंबईकरांसाठी खूषखबर आहे. सिडको नवी मुंबईत 12 हजार घरं बांधणार आहे. खारघरमधल्या गृहनिर्माण योजनेची लॉटरकी लवकरच जाहीर करण्यात येईल. या गृहनिर्माण योजनेमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी ८०३ घरं, तर उच्च उत्पन्न गटासाठी ४२२ घरं असणार आहेत. खारघर तळोजा जेलजवळ असलेल्या या गृहप्रकल्पाजवळूनच मेट्रो जाणार आहे.
First Published: Wednesday, October 24, 2012, 16:46