Last Updated: Friday, August 24, 2012, 11:45
www.24taas.com,मुंबईदुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज दिल्लीला जाणार आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातल्या दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा सादर करतील. यावेळी महाराष्ट्रासाठी ३०११ कोटींच्या पॅकेजची मागणी करण्यात येणार आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थीतीचा विचार करता प्रती हेक्टर तीन हजार रुपये मदत आणि सिंचनासाठी २२१७ कोटी रुपयांची मागणी करण्यात येणार आहे.
राज्यातल्या १२२ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. राज्य सरकारनं ही घोषणा केलीये. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आणि ५० टक्क्यांपेक्षा कमी पेरण्या झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय.
मुख्यमंत्री आणि उपमुख्य़मंत्री येत्या शुक्रवारी दुष्काळासंदर्भात केंद्रीय मंत्रिगटाची दिल्लीत भेट घेऊन ज्यादा मदतीची मागणी करणार आहेत.
First Published: Friday, August 24, 2012, 11:45