MCAच्या रिंगणात मुख्यमंत्री वि. शरद पवार सामना, CM X Sharad Pawar

MCAच्या रिंगणात मुख्यमंत्री वि. शरद पवार सामना

MCAच्या रिंगणात मुख्यमंत्री वि. शरद पवार सामना
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या रिंगणात उतरले आहेत. माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य होत मुख्यमंत्र्यांनी एमसीएमध्ये एंट्री घेतली आहे.

सीएमनी एमसीएच्या मैदानात एंट्री घेतल्यानं आता शरद पवार विरुद्ध मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असा सामनाही रंगणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मुख्य म्हणजे माझी मुख्यमंत्री विलासराव देशमुखही माझगाव क्रिकेट क्लबचं सदस्य होतं एमसीएच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले होते.

महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर पवरांनंतर मुख्यमंत्रीही आता एमसीएच्या रिंगणात उतरले आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 17, 2013, 00:14


comments powered by Disqus