Last Updated: Saturday, August 25, 2012, 21:50
www.24taas.com, मुंबईटोरंटोमधील विश्व साहित्य संमेलनावरुन अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळतोय. समन्वयाची बोंब आणि नियोजनाचा अभाव यामुळे हे साहित्य संमेलन होणार की नाही, याचा संभ्रम अजूनही कायम आहे.. विमानांची तिकीटे मिळाली नसल्याने, साहित्य महामंडळाकडून संमेलनाला कुणीही जाणार नाही, असं साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी स्पष्ट केलंय.
मात्र संमेलन रद्द झालं का, याचं उत्तर देण्याचं मात्र त्यांनी टाळलंय. टोरंटोच्या आयोजकांनीच संमेलन रद्द झाल्याची घोषणा करावी, असं त्यांनी म्हटलय. त्यामुळे विश्व साहित्य संमेलनाची परंपरा खंडित होण्याची शक्यता निर्माण झालीय. राज्य सरकारकडून मिळणारा निधी, मोजक्या लोकांची उपस्थिती यामुळे पूर्वीपासूनच विश्व साहित्य संमेलनं वादात सापडली आहेत. त्यातच नियोजनाच्या अभावाने हे संमेलन वादात सापडलंय.
टोरांटो येथे होणारे संमेलन रद्द कण्याबाबची अधिकृत घोषणा शनिवारी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या संमेलनाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. दरम्यान महामंडळाच्या कार्यवाह उज्वला मेहंदळे यांनी म्हटले होते, संमेलन आम्ही रद्द केलेले नाही. टोरांटोतील संमेलनाच्या संयोजकांकडून भारतातून सर्वाना घेऊन जाता येतील इतकी तिकीटे आणि पैसे आम्हाला मिळू शकले नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही संमेलनाला जाऊ शकणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे अप्रत्यक्ष दुजोरा मिळाला.
First Published: Saturday, August 25, 2012, 21:46