Last Updated: Friday, September 27, 2013, 23:44
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारल्यानं शिवसेनेनं कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असताना, आता काँग्रेसही त्याच मार्गावर आहे.
येत्या २८ डिसेंबरला काँग्रेस स्थापना मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी काँग्रेसनं केली होती. मात्र, मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारल्यानं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष धर्मेश व्यास यांनी हायकोर्टात ‘नोटीस ऑफ मोशन’ दाखल केलीय. त्यामुळे हायकोर्ट आता शिवसेनेचा दसरा मेळावा आणि काँग्रेसच्या स्थापना दिवस मेळाव्याबाबत काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.
काँग्रेसची ही ‘नोटीस ऑफ मोशन’ म्हणजे मेळाव्यासाठी परवानगी मिळवण्याचा प्रयत्न आहे की राजकीय खेळी याबाबतही चर्चा रंगलीय.
व्हि़डिओ पाहा - •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, September 27, 2013, 23:39