Last Updated: Sunday, January 26, 2014, 22:25
www.24taas.com झी मीडिया, मुंबईराष्ट्रवादी आणि भाजपने आपले राज्यसभेचे उमेदवार जाहीर केल्यानंतर आज काँग्रेसने आपले राज्यसभेचे उमेदवार जाहीर केलेत. काँग्रेसने आधीच्याच उमेदवारांना उमेदवारी दिला आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं पुन्हा एकदा मुरली देवरा आणि हुसेन दलवाई यांना उमेदवारी दिलीय. मुरली देवरा हे माजी केंद्रीय मंत्री असून केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांचे वडील आहेत. तर हुसेन दलवाई यांना यापूर्वीही काँग्रेसनं राज्यसभेची उमेदवारी दिली होती.
आता पुन्हा एकदा त्यांना पक्षानं संधी दिलीय. काँग्रेसचे विधानसभेतले संख्याबळ पाहता मुरली देवरा आणि हुसेन दलवाई या दोघांचाही विजय निश्चित आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, January 26, 2014, 22:25