माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अडचणी वाढल्या, Congress leader and former chief minister Ashok

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अडचणी वाढल्या

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अडचणी वाढल्या
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चव्हाण यांच्या विरोधात खटला चालविण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने थेट राज्यपाल के शंकर नारायण यांच्याकडे परवानगी मागितली आहे.

मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणात अशोक चव्हाण यांचे नाव आहे. आदर्श घोटाळ्यात अनेक जणांना अटक झाली. तर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी क्लिनचिट मिळाली आहे. मात्र, आदर्श प्रकरणामुळे राज्याच्या राजकरणात भूकंप झाला.

अशोक चव्हाण यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी सीबीआयने राज्यपालांकडे केलीय अशी माहिती सूत्रांकडून मिळालीय. सीबीआयने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अशोक चव्हाण यांच्यासह १३ जणांचा समावेश आहे. आदर्श सोसायटीसाठी परवानग्या देताना गुन्हेगारी कट रचल्याचा ठपका या आरोपपत्रात चव्हाणांवर ठेवण्यात आलाय.

भारतीय दंड विधानाच्या १९७ व्या कलमा अंतर्गत चव्हाण यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी सीबीआयने मागितलीय असं राजभवनाच्या एका वरिष्ठ अधिका-याकडून समजतंय. अजून यावर काही निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.

२०१०मध्ये आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा उघड झाल्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. चव्हाण यांच्यावर आदर्शमध्ये आपल्या नातेवाईकांना फ्लॅट मिळवून दिल्याचा आरोप झाला होता. सीबीआयने या घोटाळयात त्यांना आरोपी बनवले आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Saturday, December 7, 2013, 16:07


comments powered by Disqus