Last Updated: Sunday, July 28, 2013, 19:33
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहाराष्ट्र सदनात अजूनही शंभरच्या आसपास कामं बाकी असताना महाराष्ट्र सदनाचं उदघाटन का केला असा सवाल मुख्यमंत्र्यांना सोमय्यांनी केला. बांधकाम अपूर्ण असताना उदघाटन करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. उदघाटन झाल्यापासून सदन बंद आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र सदन आपली शान आहे. मात्र हे सदन भ्रष्टाचार सदन असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. तर सोमय्यांच्या या टीकेला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलंय. भाजपच्या गप्पा नैतिकतेच्या असल्या तरी त्यांची कृती मात्र कुटीलतेची असल्याचं वारंवार दिसून आलंय. भाजपातल्या आधुनिक गोबेल्सनं किरीट सोमय्यांना आपला खास दूत म्हणून निवडलंय.
काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर बेलगाम, बेछूट आणि बेताल आरोप करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा कुटील डाव आहे. किरीट सोमय्या महाराष्ट्रात आणि इतर काँग्रेसशासित राज्यांमध्ये जाऊन आपला हा हुकुमी प्रयोग सादर करत असतात. या प्रकारातून भाजपनं आपलं बुद्धी दारिद्रयच दाखवलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, July 28, 2013, 19:33