Last Updated: Friday, May 3, 2013, 17:54
www.24taas.com, मुंबईसध्या आघाडीमध्ये एमएमआरडीए आणि म्हाडाच्या घरांची किंमत या मुद्यांवरुन कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीनं एमएमआरडीएवर केलेली टीका काँग्रेसला झोंबलेली दिसते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेवर थेट प्रत्युत्तर देणं काँग्रेसच्या नेत्यांनी टाळलंय. मात्र नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांनी लक्ष घालावं, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडं म्हाडाच्या घरांच्या किमती जास्त असल्यावरुनही राष्ट्रवादीनं टिका केली होती. त्यावरुन काँग्रेसनं म्हाडाच्या घरांच्या किमतीचं समर्थन केलंय. खासगी विकासकांपेक्षा दर कमीच असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय.
मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या एमएमआरडीएच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून राष्ट्रवादीने काँग्रेसला खिंडीत गाठायचा प्रयत्न सुरू केला आहे. आणि त्याही पुढे जात केवळ हिरवे झेंडे दाखवून लोकांना स्वप्न दाखवू नका अशी बोचरी टीकाही मुख्यमंत्र्यांवर केली.
First Published: Friday, May 3, 2013, 17:54