राज ठाकरेंवर काँग्रेसचा हल्ला, Congress targeted to MNS

राज ठाकरेंवर काँग्रेसचा हल्लाबोल

राज ठाकरेंवर काँग्रेसचा हल्लाबोल
www.24taas.com,मुंबई

बलात्काराच्या घटनांसाठी एखाद्या विशिष्ट राज्याला जबाबदार धरणं योग्य नसल्याचं काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी म्हटलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल दिल्ली बलात्काराबाबत भाष्य करताना सर्व बलात्कारी बिहारचे असल्याचं म्हणत पुन्हा एकदा परप्रांतियांवर हल्लाबोल केला होता.

राज ठाकरेंनी पुन्हा परप्रातियांचा मुद्दा घेऊन बिहारींवर तोफ डागली. राज ठाकरे बोलला की, केसेस टाकायच्या अटक करायचे, पण बलात्कार करणारे होते कोण बिहारीच ना?, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. दरम्यान, बलात्काराच्या घटनांसाठी एखाद्या विशिष्ट राज्याला जबाबदार धरणं योग्य नाही. मनसेनं आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, असा सल्लाही सावंत यांनी दिलाय. मनसेच्या कार्यकर्त्यांवर असलेल्या गुन्ह्यांची यादी देत राज यांनी कार्यकर्त्यांना सांभाळलं, तरी राज्यातले गुन्हे कमी होतील, असा टोलाही त्यांनी लगावलाय.


दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपी बिहारीच असल्याचे उघडकीस आले. परंतु ती बाब सोयीस्करपणे विसरली गेली आणि फक्त बलात्काराचीच चर्चा झाली, असे सांगून राज यांनी परप्रांतीयांवर पुन्हा एकदा तोफ डागली. मी द्वेष पसरवत नाही; परंतु मुंबई, दिल्लीच नव्हे तर अनेक राज्यांत बिहारी परप्रांतीयांची गुन्हेगारी वाढली आहे. शीला दीक्षित यांनी परप्रांतीयांवर वक्तव्य केले होते. मात्र, त्यांना कोणीही बोलत नाही असेही ते म्हणाले.

First Published: Monday, January 7, 2013, 08:59


comments powered by Disqus