मुंबईत विकला गेला ५७ कोटी रुपयांना फ्लॅट, Costliest flat in Mumbai

मुंबईत विकला गेला ५७ कोटी रुपयांना फ्लॅट

मुंबईत विकला गेला ५७ कोटी रुपयांना फ्लॅट
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

देशात सध्या मंदी आहे. तरीही मुंबईतल्या प्रॉपर्टी जगतात नवनवे रेकॉर्डस केले जात आहेत. मुंबईत नुकताच एक फ्लॅट तब्बल १ लाख ३५ हजार स्क्वेअर फुटांच्या दरानं विकला गेला. आतापर्यंतचा हा सगळ्यात महागडा फ्लॅट ठरलाय.

अरबी समुद्राच्या किना-यावर बसलेलं मलबार हिल. म्हणजे मुंबईतला स्वर्गच... धावपळीच्या मुंबईतला हा परिसर एकदम शांत आणि निवांत....या भागातल्या दर्शन अपार्टमेंटमधला एक फ्लॅट सध्या चर्चेत आहे. कारण या फ्लॅटची विक्री तब्बल एक लाख पस्तीस हजार रुपये स्क्वेअर फूट या भावानं विकला गेलाय. या ड्युप्लेक्स फ्लॅटचा एकूण एरिया 1386 स्क्वेअरफुट इतका आहे. त्यामुळे हा अख्खा फ्लॅट तब्बल ५७ कोटींना विकला गेलाय. या फ्लॅटमध्ये ७०० स्क्वेअर फूटांच्या एका गॅरेजचाही समावेश आहे. अर्थातच एका उद्योजकानं हे घर खरेदी केलंय.

मुंबईत याआधीही असे किमती सौदे झालेत. जून महिन्यात वरळीच्या समुद्र महल बिल्डिंगमधला एक फ्लॅट 1 लाख 18 हजार स्वेच्अर फुटानं विकला गेला होता. तर फेब्रुवारी महिन्यात मलबार हिल्समधल्या आयएल पलाज़ोमधल्या एका फ्लॅटची 1 लाख 11 हजार 400 रुपये स्क्वेअर फूट दरानं विक्री झाली होती. गेल्या वर्षी जून महिन्यात नेपियन सी रोडवरच्या टहनी हाईट्स बिल्डिंगमधला फ्लॅट 1 लाख 20 हजार स्क्वेअर फूट तर ब्रीच कँडी अपार्टमेंटमधला फ्लॅट 1 लाख 11 हजार 300 रुपये स्क्वेअर फुटांनी विकला गेला.

(Zee Media)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 25, 2013, 21:47


comments powered by Disqus