Last Updated: Tuesday, November 13, 2012, 22:17
www.24taas.com, मुंबई आता जर तुम्हाला फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होत असेल तर तुम्ही तत्काळ तुमची तक्रार दाखल करून या त्रासापासून सुटका करून घेऊ शकता. ही तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांनी चक्क एक स्पेशल हेल्पलाईनच जाहीर केलीय.
मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना (१२५ डेसिबलपेक्षा जास्त) यंदा बंदी घालण्यात आलीय. तरी काही ठिकाणी मोठ्या आवाजाचे फटाके फोडताना अनेकजण दिसत आहेत. याचा त्रास मात्र वृद्ध, रुग्ण यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. अनेक प्रयत्न करूनही पोलिसांची त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यात त्रेधातिरपीट उडते. त्यासाठी पोलिसांनी हेल्पलाईन सुरू केलीय. २२६३३३३३ या हेल्पलाईनवर तुम्ही तुमची फटाक्यांच्या आवाजाविषयीची तक्रार दाखल करू शकता. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांना ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी करण्याच्या कामात मदत करणार आहेत. मोठ्या आवाजांचे फटाके फोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी या कर्यकर्त्यांचे तसेच पोलिसांचे गट सकाळ-संध्याकाळी गस्त घालताना दिसतील.
First Published: Tuesday, November 13, 2012, 22:17