क्रांतिस्तंभावर लाथ मारणारा, पोलिसांच्या ताब्यात, cst attack

क्रांतिस्तंभावर लाथ मारणारा, पोलिसांच्या ताब्यात

क्रांतिस्तंभावर लाथ मारणारा, पोलिसांच्या ताब्यात
www.24taas.com, मुंबई

सीएसटी परिसरातील पवित्र अमर जवान क्रांतिस्तंभावर लाथा मारून त्याची नासधूस करणार्‍या शाहबाज अब्दुल कादीर शेख (२०) याला क्राइम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी माहीम येथून अटक केली. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी क्रांतिस्तंभ काठीने तोडणार्‍या अब्दुल कादीर अन्सारी याला पकडले होते.

जोगेश्‍वरी येथील रहिवासी असलेल्या शाहबाज याला गुरुवारी दुपारी माहीम येथील रहेजा रुग्णालयाजवळ पकडल्याची माहिती सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी दिली. शाहबाज एका टुरिस्ट एजन्सीमध्ये चालक म्हणून नोकरी करीत असल्याची माहिती रॉय यांनी दिली.

आझाद मैदान येथील रॅलीबाबतची माहिती शाहबाज याला ‘एसएमएस’मार्फत मिळाली. त्यानंतर यासंदर्भात जोगेश्‍वरीमध्ये ठिकठिकाणी झालेल्या बैठकांमध्येदेखील शाहबाज याने हजेरी लावली.

First Published: Friday, August 31, 2012, 08:37


comments powered by Disqus