सीएसटी दंगल: अहमद रझाला अटक CST riot: one arrested

सीएसटी दंगल: अहमद रझाला अटक

सीएसटी दंगल: अहमद रझाला अटक
www.24taas.com, मुंबई

11 ऑगस्टला आझाद मैदान आणि सीएसटीवर झालेल्या हिंसाचार प्रकरणी मोर्चाच्या एका आयोजकाला अटक करण्यात आली आहे. आझाद मैदानातल्या हिंसाचार प्रकरणी, मदिन उल इल्म या संघटनेचा सरचिटणीस अहमद रझा याला सोमवारी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली.

आसाम आणि म्यानमारमधील हिंसाचाराच्या विरोधात मुस्लिम संघटनांनी 11 ऑगस्टला मोर्चा काढला होता. अहमद रझा याने मुंबई पोलिसांकडे 11 ऑगस्टच्या रॅलीची परवानगी मागणारे एक पत्र दिले होते. या सभेला फक्त 1000 माणसे येतील, असं त्यानं सांगितल होतं. मात्र अहमद रझा याने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

यावेळी रझा अकादमीच्या काही सदस्यांनी दंगल केल्यामुळे मुंबईतील शांतता भंग पावली होती. या लोकांनी वृत्तवाहिनीच्या ओबी व्हॅनलाही आग लावली होती. तसंच महिला पोलिसांशी गैरवर्तन केलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या परिसरात नासधूस केली होती.

First Published: Tuesday, December 4, 2012, 17:30


comments powered by Disqus