महिलेवर चाकू हल्ला करणाऱ्याला अटक Dadar attacker arrested

महिलेवर चाकू हल्ला करणाऱ्याला अटक

महिलेवर चाकू हल्ला करणाऱ्याला अटक
www.24taas.com, मुंबई

मुंबईत आणखी एका महिलेवर भरदिवसा कोत्याने हल्ल्या केल्याची घटना घडली. दादरच्या स्वामी नारायण मंदिराजवळ एका तरुणीवर पत्नी समजून कोत्यानं हल्ला केल्याची घटना घडली. या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

हल्लेखोर विजय संगेलकरला अटक करण्यात आलीय. या घटनेमुळे मुंबईतील महिला पुन्हा एकदा असुरक्षित असल्याचं समोर येतंय. दरम्यान, पत्नीने आरोपीविरोधात कलम 498 अंतर्गत घरगुती हिंसा आणि हुंड्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

आज सकाळी एका महिलेवर तरूणाने कोयत्याने हल्ला केल्यानंतर घबराट पसरली. ही घटना सकाळी नऊ ते साडेनऊ वाजता घडली. ऑफिसला जाणाऱ्यांची लगबग सुरू असताना हा हल्ला झाल्याने गोंधळ उडाला. पतीला पत्नीवर हल्ला करायचा होता. मात्र, दुसऱ्याच महिलेला कोयत्याने भोसकल्याने ही महिला रक्तबंबाळ झाली आहे. या महिलेला उपचारासाठी सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

First Published: Monday, December 17, 2012, 17:27


comments powered by Disqus