Last Updated: Wednesday, August 21, 2013, 13:50
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई दादर रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी काही घातपात होण्याची शक्यता असल्याचा निनावी फ़ोन पुणे रेल्वे पोलीसांना सकाळी आलाय. त्यामुळे दादर स्थानकावर बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
प्रवाशांची आणि सामानांची तपासणी केली जातेय. डॉगस्कॉडच्या मदतीनं स्टेशनचा कोपरानं कोपरा तपासला जातोय. मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलीस संयुक्तपणे ही कामगिरी बजावतायत.
मध्य रेल्वेवरील दादर स्थानकावर घातपात करण्याची धमकी देणारा फोन पुणे कंट्रोल रुमला आल्याने हायअलर्ट जारी करण्यात आलाय. अज्ञाताने दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४ उडवण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे दादर स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
बुधवारी सकाळी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात हा निनावी फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने ही धमकी दिल्यावर पुणे पोलिसांनी या प्रकाराची माहिती मुंबई पोलिसांना दिली. माहिती मिळताच, स्टेशनवरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्टेशनवर कुठली संशयास्पद हालचाल जाणवतेय का, याकडे पोलिसांचं लक्ष आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Wednesday, August 21, 2013, 12:04