Last Updated: Thursday, June 12, 2014, 15:09
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई डान्स बारची छमछम अखेर कायमची थांबणार आहे. डान्स बारवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी राज्य सरकार नवीन विधेयक आणणार आहे.
नव्या विधेयकानुसार, फाइव्ह स्टार हॉटेलमधील डान्सवरही संक्रांत कोसळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत नव्या विधेयकावर शिक्कामोर्तब करण्यात आले. लवकरच विधीमंडळामध्ये हे विधेयक मांडण्यात येणार आहे.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारानं यापूर्वीही सरकारने राज्यामध्ये डान्स बारवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, डान्स बारचालकांनी त्याविरोधात कोर्टात दाद मागितली.
जुन्या कायद्यात काही त्रुटी राहिल्याने कोर्टाने डान्स बारना सशर्त परवानगी दिली होती. मात्र, आता डान्सबारवर कायमस्वरूपी बंदीसाठी महाराष्ट्र सरकार नवीन विधेयक आणणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 12, 2014, 15:09