राज्यात ‘छम-छम’ कायमचे बंद, विधेयक मंजूर , dance bar will close permanently in state

राज्यात ‘छम-छम’ कायमचे बंद, विधेयक मंजूर

राज्यात ‘छम-छम’ कायमचे बंद, विधेयक मंजूर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

डान्सबारवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठीचे विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. या विधेयकाचं वैशिष्ट्य म्हणजे डान्स बारसोबतच थ्री स्टार आणि फाइव्ह स्टार हॉटेल्समधील डान्सही बंद होणार आहेत.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले आणि ते एकमतानं मंजूर करण्यात आलं. 2005 मध्ये राज्यात सर्वप्रथम डान्स बार बंदी लागू करण्यात आली होती.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र डान्स बारमालक कोर्टात गेल्यानंतर ही बंदी उठली. त्यामुळं जुन्या कायद्यातील त्रुटी दूर करून डान्सबारवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी हे नवीन विधेयक आणण्यात आलंय.

जुन्या कायद्यात काही त्रुटी राहिल्याने कोर्टाने डान्स बारना सशर्त परवानगी दिली होती. मात्र, आता डान्सबारवर कायमस्वरूपी बंदीसाठी महाराष्ट्र सरकार नवीन विधेयक आणले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 14, 2014, 08:36


comments powered by Disqus