चावी घुसली मेंदूपर्यंत, पण चिमुरडीचा वाचला जीव, dangerous accident in mumbai, child girl saved by dr

चावी घुसली मेंदूपर्यंत, पण चिमुरडीचा वाचला जीव

चावी घुसली मेंदूपर्यंत, पण चिमुरडीचा वाचला जीव
www.24taas.com, झी मिडिया, मुंबई

लहान मुलांना खेळण्यासाठी इथुन पुढे चाव्याचा जुडगा देऊ नका कारण हा चाव्याचा जुडगा जीव घेणा ठरू शकतो.घाटकोपर मध्ये एका चिमुरडी सोबत झालेल्या घटनेवरून ही गोष्ट समोर आलीये.पाहूयात एक रिपोर्ट.

घाटकोपरमध्ये राहणारी पाच वर्षांची इराम चौधरी ही चिमुरडी मोठ्या संकटातून वाचलीय. घरामध्ये चाव्यांच्या जुडग्याशी खेळत असताना ती तोल जाऊन पडली आणि धक्कादायक बाब म्हणजे चाव्यांच्या जुडग्यामधली एक चावी थेट तिच्या डोक्यात मेंदुपर्यंत घुसली. आजूबाजूच्या लोकांनी डोक्यात घुसलेली चावी आणि त्याला लटकणारा जुडगा अशा अवस्थेतच इरामला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यानंतर तिला सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.

सायन हॉस्पीटलमध्ये न्यूरोसर्जन डॉ.बटूक डिवोरा यांनी शस्त्रक्रिया करून चावी बाहेर काढली. सध्या या मुलीची प्रकृती स्थिर आहे.

अनेकदा पालकांच्या नकळत त्यांच्या लहान मुलांच्या हातामध्ये खेळताना टोकदार वस्तू येतात. मात्र दुर्देवाने अशी एखादी घटना घडल्यानंतर गोंधळाच्या भरात पालकांनी ती वस्तू हाताने काढण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन डॉक्टरांनी केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 17, 2013, 21:57


comments powered by Disqus