दाऊदने घडवला सीएसटी हिंसाचार- गुप्तचर संस्था, Daud ibrahim on cst terror

दाऊदने घडवला सीएसटी हिंसाचार- गुप्तचर संस्था

दाऊदने घडवला सीएसटी हिंसाचार- गुप्तचर संस्था
www.24taas.com, मुंबई

सीएसटी हिंसाचाराचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहचले होते. पण आता तेच धागेदोरे हे दुबईपर्यंत पोहचले असल्याचे गुप्तचर संस्थेने सांगितले. या हिंसाचारामागे दाऊद इब्राहिम याचा हात असल्याचे समजते. रझा अकादमीच्या आंदोलनावेळी आझाद मैदान आणि सीएसटी परिसरात झालेल्या हिंसाचारामागे कुख्यात दाऊद इब्राहिमचा हात असल्याचे गुप्तचर संस्थेने म्हटले आहे. या प्रकरणी गुप्तचर संस्थेने महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला सुचित केले आहे.

गृह विभागातील एका उच्चाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय टेलिफोनिक चर्चेच्या आधारे गुप्तचर संस्थेने ही माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दंगलीच्या दुस-याच दिवशी यामागे परकीय शक्तींचा हात असल्याचे म्हटले होते.

आता गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती खरी ठरताना दिसत आहे. ११ऑगस्टला झालेल्या दंगलीसंबंधीची सर्व माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांना दिली जात आहे.


First Published: Friday, September 7, 2012, 21:29


comments powered by Disqus