प्रशासनाचा हलगर्जीपणा : दोन युवतींच्या मृतदेहांची झाली अदलाबदल, Dead bodies exchange by mistake

प्रशासनाचा हलगर्जीपणा : दोन युवतींच्या मृतदेहांची झाली अदलाबदल

प्रशासनाचा हलगर्जीपणा : दोन युवतींच्या मृतदेहांची झाली अदलाबदल
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटना प्रकरणात प्रशासनच्या हलगर्जीपणाचा आणखी एक प्रकार उघड झालाय. खातरजमा न करताच नातेवाईंकाना मृतदेह सुपूर्द करण्यात आलेत.

पल्लवी जाधव या युवतीचा मृतदेह कोमल गायकवाड म्हणून गायकवाड कुटुंबियांना देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. पल्लवी जाधव या 18 ते 20 वर्षाच्या युवतीचा मृतदेह काल ढिगा-यातून काढल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी मृतदेह ओळखला होता. तसंच तिच्या अंगावरील दागिनेही नातेवाईकांकडे दिले होते. त्यानुसार जेजे हॉस्पीटलमधील 4 नंबरच्या वॉर्डमध्ये पेपरही तयार झाले. काही वेळानंतर गायकवाड कुटुंबियांनी पल्लवीच्या मृतदेह हा कोमलचा असल्याचं सांगितलं. यावेळी तिथं असणा-या पोलीस अधिका-यानं पल्लवी जाधवच्या नातेवाईकांना न बोलवता परस्पर पल्लवीचा नाव खोडून कोमल गायकवाडचे नाव लिहले. त्यानुसार गायकवाड कुटुंबियांनी आज मृतदेह ताब्यात घेवून अंत्यसंस्कार केले. पल्लवीचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

या दुर्घटनेत पल्लवीसह तिची आई, बहिण आणि भावाचा मृत्यू झालाय. तर वडीलांवर आयुसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. हायप्रोफाईल व्यक्तींचे मृतदेह ताब्यात देताना डीएनए टेस्ट केली जाते. मात्र सामान्यांचे मृतदेह मात्र अशा पद्धतीने कोणतीही खातरजमा न करता दिले जातात. प्रशासनाच्या या कार्यपद्धतीवर जाधव कुटुंबियांनी रोष व्यक्त केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, September 29, 2013, 21:34


comments powered by Disqus