कृपया अभ्यागतांनी उपमुख्यमंत्र्यांच्या पाया पडू नये

कृपया अभ्यागतांनी उपमुख्यमंत्र्यांच्या पाया पडू नये

कृपया अभ्यागतांनी उपमुख्यमंत्र्यांच्या पाया पडू नये

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना चरणस्पर्श करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार चंद्रकांत खैरे यांचा फोटो अलिकडेच गाजला होता. शिवसेनेतला एवढा ज्येष्ठ नेता आदित्य ठाकरेंच्या पाया पडत असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

चंद्रकांत खैरे यांनी नंतर आपण चरणस्पर्श केल्याचा इन्कारही केला. या प्रकरणाचा आता अन्य राजकारण्यांनी मोठा धसका घेतलेला दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर आपल्या देवगिरी बंगल्याबाहेर चक्क कागदी फलकच लावलाय.

कृपया अभ्यागतांनी मा. उपमुख्यमंत्री महोदयांच्या पाया पडू नये, अशी विनंती या फलकावर करण्यात आलीय. त्यामुळं हा फलक सध्या चांगलाच गाजतोय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 21, 2014, 23:17


comments powered by Disqus