जनावरांची बेकायदेशीर विक्री... कत्तरखान्याचा पर्दाफाश,devnar kattalkhana pardafash

कत्तलखान्याचा पर्दाफाश... दलालांना रंगेहाथ अटक

कत्तलखान्याचा पर्दाफाश... दलालांना रंगेहाथ अटक
www.24taas.com, मुंबई

मुंबई महापालिकेच्या देवनार कत्तलखान्यात बकरी ईदसाठी आणलेल्या बकऱ्या मेंढ्याची बेकायदेशीर विक्री उघड झालीय. हा पर्दाफाश केलाय, विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम यांनी... मात्र दलाल आणि पालिका सुरक्षा यंत्रणांच्या संगनमतानं सुरू असलेल्या विक्रीमुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय.

मुंबई महापालिकेचा हाच तो देवनार कत्तलखाना... बकरी ईदसाठी इथं बकऱ्या आणि मेंढ्याची विक्री होतेय. दलाल आणि पालिकेच्या सुरक्षा यंत्रणेच्या संगनमतानं हा व्यवहार सुरू आहे. विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी कत्तलखान्यात टाकलेल्या रेडमध्ये ही बाब उघड झालीय. पालिकेनं एक कोटी रूपये खर्च करून विक्रीसाठी उभारलेले शेड वृद्ध आणि बालकांना निवाऱ्यासाठी देण्यात आले आहेत. मात्र, तिथेच सुरू असलेल्या बेकायदेशीर विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला. दलालांनाही रंगेहाथ पकडण्यात आलं.

कत्तलखान्यासाठी लागणारं मेडिकल सर्टिफिकेटही बोगस डॉक्टरकडून दिलं जातं. कत्तलखान्याच्या महाव्यवस्थापकांनी दलालांवर कारवाईचं आश्वासन दिलंय. मुंबई कत्तलखान्यात दलाल बकऱ्यांची पाच हजार ते पाच लाखाला विक्री करताना दिसतायत. मात्र, या व्यवहाराची नोंद होत नसल्यानं पालिकेच्या कोट्यवधीच्या महसूलाचीही कत्तल होतेय.

First Published: Monday, October 22, 2012, 18:38


comments powered by Disqus