Last Updated: Saturday, January 12, 2013, 09:05
www.24taas.com, मुंबई वादग्रस्त सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांची तडकाफडकी मुंबई बाहेर बदली करण्यात आलीय.
वसंत ढोबळे काल सांताक्रूझ पश्चिम येथे अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी घाबरुन हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं एकाचा मृत्यू झाला. मदनलाल जायस्वाल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या घटनेनंतर संतप्त लोकांनी वाकोला पोलीस ठाण्याला घेराव घातला. सहआयुक्त सदानंद दाते, खासदार प्रिया दत्त, कृपाशंकर सिंह, राज पुरोहीत यांनी घटनास्थळी धाव घेतली. निष्पक्ष चौकशीसाठी ढोबळे यांची बदली करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
मुंबईतील अनेक पब, बार आणि पार्ट्यांवर कारवाई केल्यामुळे मुंबईतील पब आणि बार मालकांमध्ये ढोबळे यांच्या नावाचा दरारा दिसून येत होता. तसेच रात्रभर पब आणि डिस्कोथेकमध्ये रमणा-या धनदांडग्यांनी ढोबळेंचा पुरता धसका घेतला होता.
First Published: Saturday, January 12, 2013, 09:05