Last Updated: Wednesday, November 6, 2013, 14:24
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईतील व्यापारी आणि मनसे उपाध्यक्ष असणाऱ्या हाजी अराफत शेख यांनी कुराणाचं बहुभाषिक डिजिटल व्हर्जन लाँच केलं आहे. या कुराणाची पहिली प्रत शेख यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेट दिली आहे.
हाजी अराफत शेख हे यासर अराफत सेवाभावी संस्थेचे प्रमुखही आहेत. डिजिटल कुराणाच्या युजर फ्रेंडली व्हर्जनमुळे राज ठाकरेंना आनंद झाला आहे. हे डिजिटल कुराण वाचून इस्लामची शिकवण समजावून घेण्याचं आश्वासनही राज ठाकरेंनी आपल्याला दिल्याचं शेख यांनी म्हटलं आहे.
चार वर्षांपूर्वी शेख यांनी कुराणाची मराठी प्रत राज ठाकरेंना भेट दिली होती. नव्या डिजीटल व्हर्जनमुळे हेडफोनद्वारे कुराण ऐकता येणार आहे, तसंच त्याचा अर्थही समजून घेता येणार आहे. कुराणाचं हे डिजिटल व्हर्जन हिंदी, उर्दू, मराठी गुजराती, बंगाली, तेलुगू, तामिळ, मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय चायनिज, फ्रेंच आणि पुश्तू भाषेतही उपलब्ध आहे.
IANS
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, November 6, 2013, 14:24