‘आदर्श’ अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाDiscussion on Aadarsh report in Cabinate Meet tom

‘आदर्श’ अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा

‘आदर्श’ अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या चौकशी अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या चर्चा होणार आहे. या बैठकीत गेल्या वेळी झालेल्या चर्चेतले मुद्दे संमत करण्यात येणार आहेत.

त्यामुळं आदर्शच्या अहवालावर फेरविचार होण्याची शक्य़ता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या कॅबिनेटच्या बैठकीत आदर्शचा चौकशी अहवाल फेटाळण्यात आला होता.

त्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करण्याबाबत संकेत दिले होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 1, 2014, 21:15


comments powered by Disqus