मुंबईत होतोय ज्येष्ठ नागरिकांचा छळ!Disrespect with Senior Citizens

मुंबईत होतोय ज्येष्ठ नागरिकांचा छळ!

मुंबईत होतोय ज्येष्ठ नागरिकांचा छळ!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आज `फादर्स डे` सगळीकडे साजरा होत असताना ज्येष्ठ व्यक्तींचा छळ होत असल्याचं आणि त्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलंय. विशेष म्हणजे राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत हे प्रमाण सर्वाधिक आहेत...

आज फादर्स डे...आपले वडील आजोबा यांचे ऋण व्यक्त करण्याचा आजचा दिवस...मात्र यावर्षी हेल्प एजने केलेल्या सर्वेक्षण अहवालात देशात सध्या सर्वाधिक ज्येष्ठ लोकांचा छळ मुंबईत होत असल्याचं समोर आलंय. वृद्धांच्या समस्या सोडवण्यासाठी कुठलीही यंत्रणा शासनस्तरावर उपलब्द्ध नसून ज्येष्ठ नागरिक संघ आपापल्या परीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतायत. यात ज्येष्ठ नागरिकांना शासन केवळ पाचशे रुपये मानधन देऊन त्यांची चेष्टा करतंय.

देशात ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक छळ मध्य प्रदेशात होत असल्याचं समोर आलंय. मध्य प्रदेशात 77 टक्के वृध्द विविध छळांनी पीडित असल्याचं या सर्वेक्षणात दिसून आलंय. आसाम, उत्तरप्रदेश या पाठोपाठ असून महाराष्ट्राचा क्रमांक यात अकरावा आहे.

समाजात नेहमीच दुर्लक्षित असणारा वृद्ध घटक धावपळीच्या युगात अधिकच केविलवाणं जीवन जगतोय. त्यांना त्यांचा हक्क देण्यासाठी नुसता फादर्स डेचं सेलिब्रेशन नव्हे तर शासनासह समाजातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, June 16, 2013, 22:26


comments powered by Disqus