Last Updated: Tuesday, April 9, 2013, 21:25
www.24taas.com, मुंबईमराठी माणसाचं परदेश प्रवासाचं स्वप्न पूर्ण करण्यात मोठा वाटा असलेल्या ‘केसरी टूर्स’मध्ये उभी फूट पडली आहे. कंपनीला नावारुपाला आणण्यात मोलाचं योगदान असलेल्या वीणा पाटील यांना ‘केसरी’मधून बाहेर पडावं लागलंय.
वीणा पाटील यांचे भाऊ शैलेश पाटील यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर हा वाद उफाळला आहे. वीणा पाटील यांना कंपनीच्या मेंटॉर म्हणून पत्रच 1 एप्रिल रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत देण्यात आलं. त्यामुळे त्या नाराज झाल्या. वीणा पाटील यांच्यासह त्यांचे पती सुधीर पाटील, धाकटा भाऊ हिमांशू, भावजय सुनीला हेदेखील केसरीतून बाहेर पडले आहेत. या चौघांकडे कंपनीचे 48 टक्के शेअर्स आहेत.
बाहेर पडण्याचा निर्णय अत्यंत क्लेशदायक असला तरी मानसिकदृष्ट्या संबंध तुटला की ताणून धरण्यात अर्थ नाही, हे समजल्यामुळे आपण बाहेर पड़ल्याचं वीणा पाटील यांनी `झी 24 तास`ला सांगितलं.
First Published: Tuesday, April 9, 2013, 21:25