सेनेचे दिवाकर रावते निलंबित, ३१ डिसेंबरपर्यंत नो एंट्री!, Diwakar Ravte suspended

शिवसेनेचे दिवाकर रावते डिसेंबरपर्यंत निलंबित

शिवसेनेचे दिवाकर रावते डिसेंबरपर्यंत निलंबित
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

सिंचन घोटाळ्याबाबत सभागृहात चर्चा करण्यास नकार दिल्यानंतर, शिवसेना नेते आणि आमदार दिवाकर रावते यांनी सभापतींना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आलंय. ३१ डिसेंबरपर्यंत त्यांना निलंबित करण्याचे आदेश सभापतींनी दिलेत.

तर दुसरीकडं सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी दर्शविली आहे. ही तयारी कामकाजावर बहिष्कार घालणा-या विरोधकांनी चालवलीय. दोनच दिवसांपूर्वी पोलीस सूर्यवंशी मारहाण प्रकरणी पाच राडेबाज आमदारांचं निलंबन रद्द करण्यात आलं होतं. या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच आमदार दिवाकर रावते यांना निलंबित करण्यात आलं आहे. रावते यांनी विधानसभेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या दालनात असभ्य वर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.


सिंचनाच्या मुद्यावरून आज सकाळी विधानपरिषदेत विरोधकांनी सभात्याग केला. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी विधान परिषदेत चर्चा होऊ शकलेली नाही. सिंचनाच्या मुद्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं, त्यावर चर्चा करता येणार नाही, अशी भूमिका सरकारनं घेतली. यावेळी चर्चेसाठी सरकार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, July 26, 2013, 15:20


comments powered by Disqus