बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाही; सानुग्रह अनूदान!, diwali bonus to best employees

बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाही तर सानुग्रह अनूदान!

बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाही तर सानुग्रह अनूदान!
www.24taas.com, मुंबई

बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलाय. महापौर सुनिल प्रभू तसंच बेस्ट प्रशासन आणि संघटनेमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या बेस्टची अवस्था हलाखीची झाली असून मुंबई महापालिकेकडून 12 टक्के व्याजदरानं तातडीनं कर्ज घेतलं तरच दिवाळीत कर्मचा-यांना पगार देता येईल, असं म्हणत बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदा बोनस मिळणार नसल्याचं याआधी बेस्ट व्यवस्थापनानं जाहीर केलं होतं. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी महापौरांच्या दालनात झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदा सानुग्रह अनुदान देणार येणार असल्याची घोषणा करण्यात आलीय.

पण, नेमकं किती रुपयांचं सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांना देण्यात येईल यावर मात्र अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. येत्या दोन-तीन दिवसांत सानुग्रह अनुदानाची रक्कम किती असेल याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं जाहीर करण्यात आलंय.

First Published: Friday, November 9, 2012, 08:08


comments powered by Disqus