राजना महत्त्व देऊ नका - मुंबई हायकोर्ट, Do not give excessive importance to Raj Thackeray - Mumbai court

राजना महत्त्व देऊ नका - मुंबई हायकोर्ट

राजना महत्त्व देऊ नका - मुंबई हायकोर्ट
www.24taas.com, मुंबई

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासारख्या राजकारण्यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गजर नाही. त्यांना इतके महत्त्व देण्याची गरज नाही, असे मत मुंबई हायकोर्टाने व्यक्त केले आहे.

राज ठाकरे हे प्रसिद्धीसाठीच उलटसुलट विधाने करतात. त्यांच्या वक्तव्याकडे देऊ नकी, असे सांगत मुंबई हायकोर्टाने राज यांच्या विरोधात दाखल झालेल्या अवमान याचिकेवर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. राज यांच्या वक्तव्यावर अवमान याचिका दाखल करून काही लोकांना अकारण प्रसिद्धी मिळवून देतात अशा शब्दांत याचिकाकर्त्यालाही कोर्टाने फटकारले.

शिवाजी पार्क मैदान निवडणूक प्रचारसभेसाठी नाकारण्याच्या कोर्टाच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी भाष्य केले होते. या मुद्द्यावरून अॅड. एजाज नक्वी यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. मुख्य न्या. मोहित शहा व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे याचिका सुनावणीसाठी आली होती. त्यावेळी खंडपीठाने व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेचा दाखला दिला. या व्यंगचित्रकाराला कुणी ओळखत नव्हते. मात्र त्याला अटक झाल्यावर त्या व्यंगचित्रकाराला लोक ओळखू लागले. तसाच हा प्रकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राज प्रसिद्धीसाठी उलटसुलट विधाने करीत असतात. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. पण तुमच्यासारखे लोक अवमान याचिका दाखल करून काही लोकांना उगाचच प्रसिद्धी मिळवून देतात, अशा शब्दांत अॅड. एजाज नक्वी यांची खंडपीठाने चागंलीच खरडपट्टी काढली. राज यांनी असे काही वक्तव्य केले असेल तर हायकोर्ट त्याबाबत सुमोटो ( स्वतःहून दखल ) घेईल, असे स्पष्ट केले.

First Published: Tuesday, October 2, 2012, 10:16


comments powered by Disqus