Last Updated: Monday, August 20, 2012, 19:53
www.24taas.com, मुंबई‘उद्याचा मोर्चा काढणार म्हणजे काढणारच’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकच एल्गार केला. सीएसटी हिंसाचाराच्या निषेधार्थ उद्या मनसेच्या मोर्च्यासंबंधी पत्रकार परिषद घेतली. माणिकराव ठाकरे सागरगोटा आहे, त्यांनी याची आधीच काळजी करायला हवी होती. मुंबई दंग्याचे आम्हांला राजकारण करायचं नाही. असं म्हणत राज ठाकरेंनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
‘मनसैनिकांच्या गाड्या बाहेरच्या बाहेरच अडवल्या जात आहेत. काही झालं तरी मी मोर्चा काढणार म्हणजे काढणारच.’ असं म्हणत राज ठाकरे यांनी पोलिसांच्या कारवाईवर ताशेरेच ओढले. ‘त्यांनी मुंबईत येणाऱ्यांना कार्यकर्त्यांना पोलीस का अडवतात? मी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. आमच्या मोर्चाला अद्याप परवानगी मिळाली नसल्याचं राज यांनी सांगितलं. मात्र परवानगी मिळाली नाही तर मोर्चा निघणारच असं राज म्हणाले. पण मनसेच्या मोर्चाला परवनागी का नाकारता असा सवाल राज यांनी यावेळी केला.
आमच्या मोर्च्याला काहीही त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास मात्र याचे परिणाम वाईट होतील. सरकारने गप्प बसून आमचा मोर्चा गप्पपणे पाहात बसावा. असा सज्ज़ड दमच राज ठाकरे यांनी भरला. जर काही वेडेवाकडापणा केला तर परिणाम वाईट होतील. सेनेचा पाठिंबा मिळण्यासाठी हा मोर्चा काढलेला नाही. हिंदुत्वाचा मुद्दा नाही, मात्र आम्ही मोर्चा काढल्यानंतर त्यांना आठवतं का? असं म्हणत राज यांनी सेनेकडे दुर्लक्षच केलं.
First Published: Monday, August 20, 2012, 19:28