Last Updated: Tuesday, April 23, 2013, 10:49
www.24taas.com, मुंबईनिवासी डॉक्टरांनी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने रूग्णांचे मात्र चांगलेच हाल होत आहे. त्यामुळे रूग्णांना पुन्हा एकदा वेठीस धरलं जातयं. राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारला आहे.
निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेनं पुकारलेल्या संपात सा़डेतीन हजार डॉक्टर सहभागी झालेत. त्यामुळं त्याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. अनेक हॉस्पिटल्समधील सीटीस्कॅन, एम आर आय सारख्या यंत्रणा बंद आहेत.. तर रूग्णांना एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवले जात आहेत.
डॉक्टरांच्या या संपामुळे रूग्णांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत... मात्र रूग्ण सेवेसाठी प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध असल्याने संपाचा रूग्णसेवेवर कोणताही परिणार होत नसल्याचं निवासी डॉक्टरांनी सांगितलं आहे.
First Published: Tuesday, April 23, 2013, 10:49