Last Updated: Friday, April 26, 2013, 13:09
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई गोवंडी येथील रफीकनगर भागात एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने २५ जणांना चावा घेतला. या सगळ्यांना गोवंडी शताब्दी तसेच शीव रुग्णालयात नेण्यात आले.
२५ जणांमधील सहा लहान मुलांना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतरांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मोकाट कुत्रा पिसाळला आणि एकापाठोपाठ एक समोर दिसेल त्याला चावा घेत सुटला. लहान मुलांच्या गालांनाही त्याने चावे घेतल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत.
अब्दुला शेख या १२ वर्षांच्या मुलाच्या उजव्या डोळ्याच्या खाली कुत्र्याने लचका तोडला. तसेच त्याच्या कानालाही चावा घेतला. मुंबईत मोकाट कुत्र्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गोवंडीतील झोपडपट्ट्यांमध्ये साचलेले कचर्याचे ढीग हे कुत्र्यांचे अड्डे बनले आहेत.
First Published: Friday, April 26, 2013, 13:09