मुंबईत व्हिक्टोरिया हाऊसचा स्लॅब कोसळला, Drop slab of Victoria House in Mumbai

मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन ठार

मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन ठार
www.24taas.com,मुंबई

मुंबईतील वरळी भागातील कमला मिल कंपाऊंडमधील इमारतीचा स्लॅब कोसळून आज सकाळी दुर्घटना घडली. व्हिक्टोरिया हाऊसमध्ये इमारत दुरूस्तीचे काम सुरू होते, त्यावेळी स्लॅब कोसळला. यात एका महिलेचा आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ढीगाऱ्याखाली सापडलेल्या जखमींना केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वरळी परिसरातील पांडुरंग बुधकर मार्गावर असलेल्या कमला मिल कंपाऊंडमधील व्हिक्टोरिया हाऊस या इमारतीचा काही भाग आज कोसळला. यात आणखी काही जण अडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर अग्नीशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू केले.

इमारतीचा स्लॅब कोसळल्याने नऊ जण ढीगाऱ्याखाली सापडले. या ढीगाऱ्यातून त्यांना बाहेर काढण्यात आले. हे सर्व जखमी झाले आहेत. त्यांना केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच जणांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र, इमारत दुरूस्तीचे काम सुरू असताना हा अपघात झाला. इमातीत अडकलेल्या नऊ जणांना बाहेर काढले असले तरी आणखी काहीजण अडल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्नीशामक दल प्रयत्न करीत आहे. ढिगाऱ्यातून आखणी तीन जणांना सुखरूप बाहेर काढले.

First Published: Monday, December 3, 2012, 13:27


comments powered by Disqus