Last Updated: Thursday, June 13, 2013, 20:27
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते इस्टर्न फ्रीवेचं उदघाटन करण्यात आलं. सीएसटी ते चेंबूरपर्यंतच्या साडे तेरा किलोमीटरचा हा मार्ग मुंबईकरांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. या मार्गामुळं मुंबईकरांची ट्रॅफीकपासून सुटका होणार आहे. चेंबूरपर्यंतचे अंतर फक्त २५ मिनिटांत कापलं जाणार आहे. हा मार्ग खुला करण्यात कोणताही उशीर झाला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. इस्टर्न फ्रीवेच्या मार्गातल्या दुस-या टनेलचं काम सुरू होतं त्यामुळं हा मार्ग आतापर्यंत खुला करण्यात आलेला नव्हता, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मोठा गाजावाजा करत, विलंबाने का होईना पण ऐन पावसाळ्यात इस्टर्न फ्री वेचं उद्घाटन झालं असलं तरी, तरी या निमित्तानं नव्या प्रश्नांना जन्म दिलाय. फ्री वे सुरु होणार आणि ज्या ठिकाणी संपणार त्या दोन्ही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार आहे. तसचं या रस्त्यावर एकही सिग्नल नसल्यानं वेगमर्यादेचं काय होणार, हा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. रस्त्यावरचे अपघात रोखण्यासाठी वाहनांच्या वेग मर्यादेवर कोण नियंत्रण ठेवणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येतोय.
रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणाही नसल्यानं सुरक्षेचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. तेल कंपन्यांचे डोपोही या रस्त्याच्या बाजूलाच असल्याने काही ठिकाणी व्ह्यू बॅरिअर्सचीही आवश्यकता आहे. आता एमएमआरडीए याचा आढावा घएणार का आणि मुख्यमंत्री या प्रश्नात लक्ष घालणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, June 13, 2013, 20:12