Last Updated: Wednesday, June 12, 2013, 09:04
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई गेले काही दिवस उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेला बहुचर्चित ईस्टर्न फ्री-वे म्हणजेच पूर्व मुक्त मार्गाचे दोन टप्पे अखेर गुरुवारी १३ जूनला वाहतूकीसाठी खुले होत आहेत.
मिलन सबवे फ्लायओव्हरचे २४ जून रोजी उद्घाटन करतानाच मुख्यमंत्री चव्हाण यांनी पावसाळ्यापूर्वी इस्टर्न फ्रीवेचे उद्घाटन करण्यात येईल , असे जाहीर केलं होतं. पण, १० जूनला झालेल्या पहिल्याचं पावसानं मुंबईत सखल भागांत पाणी साचल्यानं रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे हा मार्ग खुला का केला जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी तीन वाजता या १४ किलोमीटरच्या मार्गाचं उद्घाटन होणार असल्याचं एमएमआरडीएनं जाहीर केलंय. या रस्त्यामुळे दक्षिण मुंबई हे पूर्व उपनगर तसंच नवी मुंबईला जलद गतीनं जोडलं जाणार आहे. चेंबूर ते सीएसटीपर्यंतचा प्रवास अवघ्या २५ मिनिटांत शक्य होणार असल्याचा दावा एमएमआरडीएनं केलाय. या मार्गामुळे चेंबुर, शीव, दादर, भायखळा मार्गावरची वाहतूक कोंडी कमी व्हायलाही मदत होईल. तसंच दक्षिण मुंबईतील वाहनांना नवी मुंबई , पनवेल , पुणे येथे जाण्यासाठीही या मार्ग सोयीचा ठरेल.
केंद्रीय मंत्र्यांना वेळच नाही! इस्टर्न फ्रि वेच्या उद्घाटनासाठी याआधी यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी तसंच अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. परंतू, त्यांची वेळ न मिळाल्यानं राज्यसरकारची शाबासकीची थाप मिळवण्याची संधी मात्र हुकलीय. शेवटी या मार्गाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच उद्घाटन होणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 12, 2013, 09:04