Last Updated: Tuesday, August 13, 2013, 16:24
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसाधारणतः वयाच्या चाळिशीनंतर माणसाला हृदयासंबंधीचे विकार सुरू होतात. मात्र मुंबईमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक आला आहे आणि या अटॅकचं कारण आहे शेंगदाणा.ही घटना ३० जुलैला घडली.
२ वर्षांच्या कृष्णा यादवला शेंगदाणा खाल्ल्यावर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आई वडिलांनी डॉक्टरकडे नेल्यावर तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं, की दाणा श्वासनलिकेत अडकल्यामुळे कृष्णाला हार् अटॅक आला आहे. मुलाला दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. डॉ. अश्विनीकुमार मेहतांनी स्कॅन केल्यावर सांगितलं, की शेंगदाणा श्वास नलिकेत अडकल्यामुळे दोन्ही फुप्फुसांमध्ये ऑक्सिजन मिळण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे मेंदूलाही ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही. याला हायपोक्सिया असं म्हटलं जातं. या हायपोक्सियामुळे हृदयविकाराचा झटका आला.
बालरोगतज्ज्ञ उदय नाडकर्णी यांनी ब्रानचास्कोपीकरून शेंगदाण्याचे तुकडे काढल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे कृष्णाची प्रकृती आता बरी आहे. दात येण्याच्या आधी शेंगदाण्यासारखे पदार्थ लहान बाळांना देऊ नये, असं त्यांनी सुचवलं आहे. दात येण्यापूर्वी लहान मूल प्रत्येक पदार्थ गिळतं. याचा परिणाम श्वासोच्छ्वासावर होतो. अशावेळी कडक पदार्थ खाणं आरोग्यासाठी बाधक असतं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, August 13, 2013, 16:24