Last Updated: Thursday, May 22, 2014, 07:42
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईलोकसभा निवडणुका संपताच मुंबईत ड्रग्जची पुन्हा एकदा तस्करी सुरू झालीय. माटुंग्यामध्ये अशाच एका आफ्रिकन तस्कराला पोलिसांनी अटक केलीय. त्यानं ड्रग्ज लपवण्यासाठी भन्नाट युक्ती शोधली होती. पण चाणाक्ष मुंबई पोलिसांनी त्याचा प्लॅन हाणून पाडला.
एका अमंली पदार्थ तस्कराला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. जेल लिगाई उर्फ हाई असं या व्यक्तीचं नाव आहे. तो आफ्रिकेचा नागरिक आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५० लाखांचं हेरॉईन जप्त केलंय.
जेल लिगाई हा टुरिस्ट विझावर भारतात आला होता. त्यानं हे ड्रग्ज दिल्लीहून रेल्वेनं मुंबईला आणलं. पण, मुंबईत येताच पोलिसांच्या भीतीनं त्यानं एक युक्ती लढवली आणि कुर्ल्यामधून बांगड्यांचा एक बॉक्स घेतला. त्या बॉक्स मध्ये बांगड्या अडकवण्यासाठी असलेल्या पोकळ रॉडमध्ये त्यानं हे हेरॉईन लपवलं. पण, मुंबई पोलिसांचं खबऱ्यांचं नेटवर्क सक्षम असल्यानं जेलचा प्लॅन फसला.
पोलिसांनी जेलचा पासपोर्ट आणि व्हिसा जप्त केलाय. मुंबईत अमंली पदार्थांची तस्करी करणारी आफ्रिकन आणि नायझेरीयन तस्करांची एक मोठी टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस आता त्या दिशेनं आता तपास करतायेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 21, 2014, 19:00