Last Updated: Wednesday, June 11, 2014, 07:51
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी आरक्षणाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारमध्ये याबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मराठा आणि मुस्लिम आरक्षणाची घोषणा या आठवड्यातच होण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 4 टक्के आरक्षण दिलं जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे.
नारायण राणे समितीनं केलेल्या शिफारशींनुसार मराठा समाजाला 20 टक्के आरक्षण देण्यात येणार होतं. मात्र मुस्लिमांनाही आरक्षण देण्याचा आग्रह राष्ट्रवादीनं धरला. त्यानुसार मार्ग काढत मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण दिलं जाणार असल्याचं समजतंय.
राज्यात सध्या 51 टक्के आरक्षण आहे. या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आणि मुस्लिम समजाला आरक्षण दिलं जाणार आहे. राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या 33 टक्के आणि मुस्लिम समाजाची लोकसंख्या 12 टक्के आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 11, 2014, 07:48