आयसीआयसीआय बँकेत ६ हजार जागा भरणार, Employment opportunities in ICICI bank

आयसीआयसीआय बँकेत ६ हजार जागा भरणार

आयसीआयसीआय बँकेत ६ हजार जागा भरणार
www.24taas.com , वृत्तसंस्था, मुंबई

आयसीआयसीआय बँकेने तुमच्यासाठी एक खूश खबर दिली आहे. बँकिंग क्षेत्रात आता नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आयसीआयसीआय बँकेत ६ हजार जागा भरण्यात येणार आहेत.

आयसीआयसीआय बँकेने यंदा ५ हजार ते ६ हजार कर्मचाऱ्यांची नवी भरती केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. तर विस्तार योजना आणि सेवानवृत्ती यामुळे यंदा आयसीआयसीआयला ५ ते ६ हजार नवे कर्मचारी घ्यावे लागणार आहेत.

नव्या धोरणानुसार बॅंकेत नव्याने ३० टक्के नोकर भरती होण्याचे संकेत मिळाले आहेत. अनेक बॅंकांनी आपल्या शाखांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या शाखांमध्ये मोठ्याप्रमाणात मनुष्य बळाची गरज भासणार आहे.

अनेक बॅंकांनी आपला विस्तार वाढविण्यासाठी भर दिला आहे. यासाठी बँकांनी विस्तार योजना हाती घेतल्या आहेत. त्याअंतर्गत बँका नव्या शाखा उघडणार आहेत. आता आयसीआयसीआयही त्यामध्ये आघाडीवर आहे. त्यामुळे नव्याने नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या वर्षी सुमारे ८० हजार नव्या नोकऱ्या बॅंकिंग क्षेत्रात निर्माण होतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या २५ ते ३० टक्क्यांनी अधिक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी मोठय़ा प्रमाणावर विस्तार योजना हाती घेतल्या आहेत. त्याचा परिणाम असणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 3, 2013, 16:08


comments powered by Disqus