Last Updated: Thursday, October 18, 2012, 07:20
www.24taas.com, मुंबईएन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांची बदली मुंबई पोलीस दलाचा पश्चिम झोन मध्ये करण्यात आली आहे. तब्बल साडे सहा वर्ष निलंबित राहिल्यानंतर दया नायक जेव्हा पुन्हा सेवेत रुझू झालेत तेव्हा त्यांना लोकल आर्म्स विभागात तैनात करण्यात आलं होतं.
मात्र, आता त्यांची वेस्ट झोन मध्ये बदली करण्यात आल्यानं या भागात वाढलेली गुन्हेगारी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकताच एका मोठ्या हॉटेल व्यवसायिकावर गोळीबार झाल्याची घटना झाली होती.
दया नायक यांचं पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणावर खबऱ्यांच जाळ आहे. मुंबई पोलीस दलाला खब-यांचा याच नेटवर्कचा मोठा फायदा पोलीसांना होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
First Published: Wednesday, October 17, 2012, 23:17