साहेबांवर प्रेम करणाऱ्यांनो... : पंकजा पालवे - मुंडे, Evocation by pankaja palve munde

साहेबांवर प्रेम करणाऱ्यांनो... : पंकजा पालवे - मुंडे

साहेबांवर प्रेम करणाऱ्यांनो... : पंकजा पालवे - मुंडे

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा पालवे मुंडे यांनी आज त्यांच्या समर्थकांना एक पत्रक काढून नियंत्रण न सोडण्याचं आवाहनं केलंय. मुंडेसाहेबांच्या चौकशीचं भागभांडवल करणाऱ्यांना निर्बल करा असं त्यांनी म्हटलंय.

मुंडेंच्या मृत्यूच्या चौकशीचे भांडवल करणाऱ्यांना जनतेने निर्बल करावं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माझा पूर्ण विश्वास आहे... साहेबांच्या मृत्यूबाबत असलेल्याजनमानसातल्या आक्रोशाला ते दिशा देतील... साहेबांवर प्रेम करणाऱ्यांनी नियंत्रण सोडू नये, असं आवाहन पंकजा यांनी एक पत्रक काढून केलंय.

मृत्यूचे राजकारण नको
माझे बाबा आदरणीय मुंडे साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या व त्यांना गमावून सैरभैर झालेल्या लाखो लोकांना व कुटुंबाला धीर देण्याचे अतिशय कठीण शिवधनुष्य मी सध्या पेलत आहे. साहेब हयात नाहीत ही कल्पनाच या निष्पाप प्रेम करणाऱ्यांना सहन होत नाही. कृपया साहेबांच्या मृत्यूच्या चौकशीचे भांडवल करू पाहणाऱ्यांना जनतेने निर्बल करावे, त्यांना बळी पडू नये. दु:खी मनाचा आयुध म्हणून वापर करू नये. त्यांच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीबाबत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पक्षश्रेष्ठींशी बोलले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माझा पूर्ण विश्र्वास आहे. संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होणारा पंतप्रधान किती संवेदनशील असेल याची मला खात्री आहे. साहेबांच्या मृत्यूसंबंधातील जनमानसात असणाऱ्या आक्रोशाला ते नक्की दिशा देतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे कृपया मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्यांनी नियंत्रण सोडू नये

- पंकजा मुंडे पालवे


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 10, 2014, 19:09


comments powered by Disqus