मेट्रोच्या मार्गाचा खर्च तब्बल ८० टक्क्यांनी वाढला, Expenditures of Mumbai Metro track increase by 80%

मेट्रोच्या मार्गाचा खर्च तब्बल ८० टक्क्यांनी वाढला

मेट्रोच्या मार्गाचा खर्च तब्बल ८० टक्क्यांनी  वाढला
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या मार्गाचा खर्च तब्बल ८० टक्क्यांनी वाढला असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. फेब्रुवारी २००८ मध्ये वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर अशा ११ किमी मार्गाच्या प्रकल्पाचे काम सुरु झाले.

त्यावेळी या प्रकल्पाची किंमत २३५६ कोटी रुपये होती. मात्र `तारिख पे तारिख` या चित्रपटातील डॉयलॉगप्रमाणे तब्बल ७ डेडलाईन मेट्रो मार्ग सुरु होण्यासाठी देण्यात आल्या आहेत. डेडलाईन न पाळल्या गेल्याने दिवस वाढत गेले, प्रकल्पाचा खर्च गेला. तेव्हा आता या प्रकल्पाची खर्च ४३२१ कोटी रुपयांच्या घरांत पोहचली असल्याची गोष्ट माहिती अधिकाराखाली मिळाली आहे.

प्रकल्पाचा वाढता खर्चाचा फटका हा प्रवाशांना बसणार असल्याची भrती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली ह्यांनी व्यक्त केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 3, 2013, 20:43


comments powered by Disqus