Last Updated: Friday, November 30, 2012, 13:50
www.24taas.com, पालघरमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत अश्लील टीका केल्या प्रकरणी सुनील विश्वकर्मा या तरूणाला काल ताब्यात घेण्यात आलं होतं. पालघरमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरेंविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाला सोडण्यात आलय. या मुलाच्या नावाचं फेक अकाउंट बनवून हे काँमेंट्स केल्याचं पोलीसांनी म्हटलय.
काल पालघर पोलीसांनी मनसे कार्यकर्त्यांच्या मागणीवरुन या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होत. त्यानंतर त्याचा तपास ठाणे सायबरकडे सोपवण्यात आला होता. पोलीसांनी हा मुलगा निर्दाष असल्याचं म्हटलय. दरम्यान पोलीस आता मुख्य सुत्रधाराचा तपास करत असून अज्ञात व्यक्तीविरोधात आय टी अँक्ट ६०६ अ नुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय.
पोलिसांनी त्यानंतर सायबर विभागाकडे याबाबतची पोस्ट कोठून टाकली गेली, याची चौकशी सुरु केली. त्यानुसार प्राथमिक चौकशीत संबंधित तरुणाने कमेंट टाकल्याचे दिसून येत नसल्याने पोलिसांनी त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
First Published: Thursday, November 29, 2012, 18:02