Last Updated: Friday, November 30, 2012, 19:31
www.24taas.com, मुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर ट्विटर आणि फेसबुकवर जी खोटी अकाउंट्स तयार करण्यात आली आहे. त्याबाबत मनसेनं आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे फेसबुक आणि ट्विटरवर अनेक अकांऊट असल्याचे मनसे कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने मनसैनिकांनी त्याविरोधात सावधपणे भुमिका घेत पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
राज ठाकरे यांच्या पेजवरून काही गोष्टी अपडेट होत असतात त्या खऱ्या आहेत की खोट्या याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि त्यामुळेच मनसेनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरेंचे स्वत:चे असे ट्विटर किंवा फेसबुक यावर कुठलेही अकाऊंट नाहीये असेही पक्षाने जाहीर केले आहे.
First Published: Friday, November 30, 2012, 19:19