सोने दरात आणखी घसरण शक्य, Falling gold price, will be below the 25 thousand!

सोने दरात आणखी घसरण शक्य, 25 हजाराच्या खाली येणार!

सोने दरात आणखी घसरण शक्य, 25 हजाराच्या खाली येणार!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सोने खरेदी करण्याऱ्यांसाठी खुशखबर आहे. गेल्या दहा दिवसात सोन्याच्या किंमतीत 10 टक्क्यांनी घट झाली आहे. सोने दराची ही घसरण सुरुच राहण्याचे संकेत आहेत. गतवर्षी 35 हजारांच्यावर पोहोचलेले सोने आता 26 हजारांच्या घरात आहे. सोने दर 25 हजार रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता आहे.

सोने खरेदी करण्यासाठी लोकांचा कल नसल्याचे दिसून येत आहे. सरकारने सोन्यावरील बंदी उठवली आहे. या दोन्ही कारणामुळे सोने दरात कमालीची घट दिसून येत आहे. एकावेळी सोने 35,074 रुपये प्रतितोळा पोहोचले होते. गुंतवणूक करणाऱ्यांनी आपले पैसे हे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यास सुरुवात केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर घटल्याने याचा परिणाम बाजारावर झाला आहे. त्यामुळे बाजारात मंदी पसरण्याच्या भितीमुळे सोने खरेदी करण्याकडे कल कमी झाला आहे.

सोने दरात आणखी घट होईल, असे सोने व्यापारी आणि ज्वेलर्स असोशिएनचे महासचिव योगेश सिंघल यांनी भाकीत केले आहे. नविन सरकारने लोकांप्रती अनेक आश्वासने दिली आहेत. नव्या सरकारवर लोकांचा विश्वास बसला आहे. याचा परिणाम हा सोने किंमतीवर झालाय. वेळ पडल्यास सोने दर प्रतितोळा 25,000 रुपयांपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे.

मात्र, सध्या 26,500 रुपयापेक्षा दर खाली जाण्याची शक्यता कमी आहे. बाऊंस बॅक होऊन सोने दरात वाढ होण्याची शक्यताही आहे. दरम्यान, मंगळवारी राजधानी दिल्लीत सोने प्रतितोळा 27, 150 रूपये होते. परंतु अफवामुळे सोने दरात आणखी घट होण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला तर याचा परिमाण ही सोने दरावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने दर कमी होईल. सोने तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कस्टम ड्युटी 10 टक्क्यावरुन 2 टक्क्यांवर आणली तरी याचाही परिणाम दिसून येईल. सध्या बाजारात 22,000 रुपयांवर सोने प्रतितोळा दर होण्याची शक्यता आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 4, 2014, 21:17


comments powered by Disqus