शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी मातोश्रीवर

शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी मातोश्रीवर

शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी मातोश्रीवर

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मातोश्रीवर पोहोचले आहेत. यामुळे महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश होईल का?, या चर्चेला उधाण येणार आहे.

राज्याच्या राजकारणात समीकरण बदलाची ही चिन्हं असल्याचं सांगण्यात येत आहे. मागील दोन वर्षात राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या मनात राजू शेट्टींची प्रतिमा उंचावली आहे.

राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडी, एनडीए आणि आम आदमी पार्टीसाठी सर्व विकल्प उघडे ठेवले आहेत. तसेच राज्याला रसातळाला नेणाऱ्या सरकारला सत्तेबाहेर हुसकावून लावू असा आपण चंग बांधला असल्याचं ही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

विदर्भात यापूर्वी उद्धव ठाकरे यांचाही चांगला संपर्क राहिला आहे. दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात भेटीगाठीही घेतल्या आहेत. यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला विदर्भात मोठं यश मिळालं होतं.

राजू शेट्टी शिवसेनेसोबत आले, तर विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यात हे शेतकरी हिताय होणार असल्याचंही चर्चा आहे. राजू शेट्टी महायुतीत आल्यावर पवारांच्या शेती कळते का? , या वक्तव्याला लगाम लागेल का? हे आमामी काळात दिसून येणार आहे.

राजू शेट्टी यांनी ऊस आणि कापूस प्रश्नावर वेळोवेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या तोंडी आंदोलन करून फेस आणला आहे. राजू शेट्टींसारखा शेतकरी नेता महायुतीची जमेची बाजू ठरणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 7, 2014, 12:50


comments powered by Disqus