शाळेत गेला नाही म्हणून पित्यानं केली मुलाची हत्याfather killed his 10 year old son in Ambarnath

शाळेत गेला नाही म्हणून पित्यानं केली मुलाची हत्या

शाळेत गेला नाही म्हणून पित्यानं केली मुलाची हत्या
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. आपला चौथ्या वर्गात शिकणारा मुलगा शाळेत गेला नाही म्हणून संतापलेल्या पित्यानं मुलाला जीव जाईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत मुलाचा मृत्यू झालाय. तर नातवाच्या अशाप्रकारच्या मृत्यूचा धसका घेतल्यामुळं आजीचाही हार्ट अॅटॅकनं मृत्यू झाला.

अंबरनाथच्या शिवाजीनगरमध्ये राहणारा अजिज खान शनिवारी रात्री कामावरू परत आला. तेव्हा चौथीत शिकणारा मुलगा साजिद शाळेत गेला नसल्याचं त्याला कळलं. रागाच्या भरात त्यानं हाताला मिळालेली काठी घेऊन साजीदला बदडण्यास सुरुवात केली. वडिलांचा मार चुकविण्याच्या प्रयत्नात अजीदच्या हातातील काठी साजीदच्या डोक्यावर जोरात आदळली.
साजीदच्या डोक्यातून रक्त वाहू लागल्यामुळं त्याला तातडीनं जवळच्या हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं, मात्र मेंदूला मार बसल्यामुळं साजीदचा रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. अजीज खान अंबरनाथ मधील भीमनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि खासगी गाडीवर चालक म्हणून काम करतो.

आपल्या डोळ्यासमोर नातवानं जीव सोडल्याचा धक्का आजी सहन करू शकली नाही आणि काही मिनिटातच हृदयविकाराच्या तीव्र धक्यानं तिचंही निधन झालं. याप्रकरणी पोलिसांनी अजिज खानला अटक केली आहे. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 24, 2014, 12:13


comments powered by Disqus